Ad will apear here
Next
'साळगाव'चा हेळेश्वर
कुडाळमधील साळगाव-सुतारवाडी जवळ असलेला हा बेहड्याचा महाकाय वृक्ष "कोणे एके काळी हेळेश्वर जाहला".

बेहड्याचा महाकाय वृक्ष

होय. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी कधी प्लेगची साथ आली होती म्हणे! तेव्हा येथील कोरगावकर मंडळींनी या झाडास गाव व एकुणच परिसरातून ही पीडा घालवण्यासाठी नारळ ठेवला होता. आजही स्थानिक मंडळी सोमवारी इथे दिवा लावण्यास येतात. कोरोना संकट जाण्यासाठीदेखील लोकांनी या वृक्षास गाऱ्हाणे (प्रार्थनावजा विनंती) केले आहे. इथे येताना मनातदेखील कोणता अयोग्य विचार घेऊन येऊ नये असे येथे दिवाबत्ती करणाऱ्या कोरगावकर काकांनी सांगितले. वृक्षपूजेचे हे एक उत्तम उदाहरण. कुणी यास अंधश्रद्धा म्हणो की आणखी काही म्हणो; पण इथे मात्र हेळेश्वर 'जिवंत' आहे, सजीव, अर्थात 'जागृत' आहे. याला देवळात बंद करता येऊ शकत नाही!

या वृक्षाचा विस्तार किमान ६ गुंठे परिसरात आहे. उंची 70-80 फूट तर व्यास ८ फूटांपेक्षा अधिक. आसपास आणखीन काहीसे लहान १०-१२ बेहड्याचे वृक्ष आहेत, काजरे आहेत, तिरफळ आहेत, पळस, उंबर आहेत. या वृक्षांवर दरवर्षी आणि आत्ताही ८-१० मधमाशांची पोळी उंचावर लटकलेली आहेत, पण कदाचित वादळी व अति पावसामुळे मधमाशा दुसरीकडे गेल्या असाव्यात.

- मिलिंद पाटील

बेहड्याचा महाकाय वृक्ष १

बेहड्याचा महाकाय वृक्ष २
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UYJTCO
Similar Posts
‘भिकेडोंगरी’चो भेळो डोंगर चढायला सुरुवात झाली, गर्द झाडीतून, बांबूच्या बनातून वाट काढत आम्ही चालू लागलो. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. खरंच, केवढा असेल न हा वृक्ष. भेळो, अर्थात बेहडा Terminalia bellirica (Gaertn.) Roxb. Family: Combretaceae संस्कृत मध्ये याला ‘बिभीतक’ किंवा ‘अक्ष’ असेही नाव आहे.
सातवीण - Alstonia scholaris (L.) R. Br. कोकणात दिवाळीत ‘चावदिसाक’ सकाळी तुळशी वृंदावनासमोर ‘गोविंदा ss, गोविंदा sss, गोssविंदा..’ म्हणंत हिरव्या गार बुळबुळीत कारीट्याचा वध करून गोड-धोड खाण्याची इच्छा घेऊन घरात जाल तर आज्जी पेल्यात एक अत्यंत कडू करड्या रंगाचा विचित्र रस घेऊन वाटेत उभी असायची. मग या पेल्यातील एक तरी घोट घेतल्याशिवाय गत्यंतर नसायचं
‘योजक’ शेतकरी हा बियाणं पेरण्यापासून, त्याचं रुजणं, त्याचं वाढणं, त्याचं डोलणं, असं करत करत ते पीक हाती येईपर्यंतचा सगळा प्रवास स्वतः एन्जॉय करत असतो. तो फार संवेदनशील असतो. त्यामुळे नांगरणी यंत्रांकडून हाताला जाणवणाऱ्या कंपनापेक्षा बैलाच्या पाठीवर हात मारल्यानंतरचं बैलाचं शहारणारं अंग त्याला जास्त सुखावणारं असतं
कोकणातली आत्मनिर्भरता सुस्पष्ट दाखवणारी ‘झूम लेन्स’ शहराच्या दिशेने गेलेले अनेक तरुण आज पुन्हा कोकणात परतले आहेत. परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं एक मन सांगतंय, की इथेच काही तरी केलं पाहिजे आणि दुसरं मन विचारतंय काही करणं मला जमेल का? अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या या युवकांना प्रेरणा देणारी गोष्ट आज मी इथे सांगणार आहे. गोष्ट आहे आपल्याच सिंधुदुर्ग

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language